मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणमध्ये मोठे नुकसान झालेय. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर जाणारेत. यावर आतापासून राजकारणाला सुरुवात झाली आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका आहे.’ मुख्यमंत्री हे फक्त फोटो सेशनसाठी दौरा करत आहे. हा एक लिपस्टिक दौरा असून हा केवळ देखावा असल्याचा आरोप राणे यांनी केलाय.
एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, ‘मनगटात हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे द्यावी. आम्ही राज्यासाठी निधी आणून दाखवू. कोकणाला आम्ही कोटींची मदत करू पण यासाठी उद्धव ठाकरेंनी राजीमाना द्यावा’ असं नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा मोठ्याप्रमाणावर कोकण किनारपट्टीला बसला. यानंतर तीन दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोकण किनारपट्टी तर सोडाच मात्र मुंबईतील तडाखा बसलेल्या भागातही पाहणी दौरा केला नाही. मात्र सध्या कोकण दौऱ्यावर असणाऱ्या विरोधीपक्षनेत्यांनी या दौऱ्यासाठी इ पास काढला आहे का ? अशी माहिती माहिती अधिकारातून विचारण्यात आली आहे. हाच मुद्दा पकडत नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
ट्विट करत निलेश राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
- ‘जलयुक्त शिवारात’ बोगसगिरी, सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालकासह ६ जणांवर परळीत गुन्हा
- मराठा आरक्षणासाठी आक्रोश मोर्चाला बीडपासून सुरुवात
- म्यूकरमायकोसिसचे औषधे अल्पदरात द्या; खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
- गेवराईत नियमांचे उल्लंघन करणारे चार दुकाने सील


