Share

संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या १७९ जणांवर गुन्हे दाखल

Published On: 

औरंंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे राज्यशासनाच्या आदेशाने जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १७९ जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संचारबंदीच्या काळात फिरणाऱ्या वाहनधारकांकडून शहर वाहतूक शाखा पोलिसांनी ६ लाख ५९ हजार ८०० रूपयांचा तर विनामास्क फिरणाऱ्या १२१ जणांकडून ६० हजार ५०० रूपये असा एकूण ७ लाख २० हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी गुरूवारी (दि.२०) कळवली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे राज्यशासनाच्या आदेशाने १४ एप्रिल पासून ते १५ मे २०२१ या काळात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या आदेशान्वये शहरात विविध ठिकाणी ५४ फिक्स पॉईन्ट लावण्यात आले आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर नाकाबंदी करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत आहेत.

पोलिसांनी अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या १७९ जणांवर विविध पोलिस ठाण्यात जवळपास ३३ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार १ हजार ६२४ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ६ लाख ५९ हजार ८०० रूपयांचा तर विनामास्क फिरणाऱ्या १२१ जणांकडून ६० हजार ५०० रूपये असा एकूण ७ लाख २० हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!