Share

महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नाही म्हणल्यावर बदमान करण्याचा घाट- जयंत पाटील

Published On: 

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मोठा वाद सुरु आहे. दररोज नवनविन खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणावरुन भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत एनसीबी आणि समीर वानखेडे यांचे प्रकरण समोर आणले आहे. एकंदरीत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील, अशी इशारावजा माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. ‘महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला, मग शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार आणि मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्यन खान प्रकरण हे त्यातीलच एक आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

आर्यन खान प्रकरण बोगस प्रकरण असल्याचं नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत उघड केले आहे. आज समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे. प्रभाकर साहील याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील बॉलिवूड आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!