ठाणे : ठाण्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा चालू आहे. अलीकडेच गुढी पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी शिवसेना-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता १० दिवसांत पुन्हा एकदा मनसेची जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये राज ठाकरेंनी जयंत पाटलांवर चांगलाच निशाणा धरला आहे.
“हे कधी म्हणे गेले होते उत्तर प्रदेश मध्ये? त्यांना आता उत्तर प्रदेश मध्ये गेल्याचे कौतुक वाटतं”. अशी टीका जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर केली होती. या टीकेला राज ठाकरेंनी चांगलेच प्रत्युतर दिले आहे. म्हणाले, जंत पाटील माझं भाषण निट ऐका मी म्हंटल ज्या बातम्या कानावर येत आहेत त्यानुसार उत्तर प्रदेश मध्ये विकास झाला असेल तर त्याचा मला आनंद आहे. माझी भाषा काय आहे जर तर ची भाषा आहे.
ज्या बातम्या माझ्या कानावर येत आहेत तसा जर विकास झाला असेल तर… असं मी म्हणालो. असे बोलत जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख करत राज ठाकरेंनी टीका केली. पुढे म्हणाले, “गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मी सतत सांगत होतो. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान होतील तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेश, झारखंड, आणि बिहार या तीन राज्यांचा विकास करावा. या तीन राज्यांमधील बाहेर पडणारी माणसं जी महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्र याचं ओझं सहन करू शकत नाही. माझी सगळी भाषणं काढून बघा, असेही राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


