Share

IPL 2022 CSK vs RCB : महेंद्रसिंह धोनीसमोर विराट कोहली..! बंगळुरूनं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या संघात सामना पाहायला मिळणार आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आहेत. बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा चेन्नईचा २००वा आयपीएल सामना आहे.

यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या चार सामन्यांमध्ये सलग चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, आरसीबीने आतापर्यंत चार सामन्यांत तीन विजय मिळवले आहेत. दोन संघांमधील आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सीएसकेचा वरचष्मा आहे. चेन्नई सुपर किंग्जने १८ सामने जिंकले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कप्तान), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महीष थिक्षना, मुकेश चौधरी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!