Share

“राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची…”; वसंत मोरे ठाण्यात गरजले

Published On: 

ठाणे : पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या ठाण्यातील उत्तर सभेची सुरुवात केली. यावेळी वसंत मोरेंनी कोरोना काळात मनसेने काय काय केले, लोकांना तेव्हा मनसे का आठवली, निवडणुकीवेळी का आठवत नाही? असे बोलून नाराजी व्यक्त केली.

पुण्यात मनसेने काम केले. “गोरगरीबांना फायनान्स, बँका वाल्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. अशावेळी मनसेची दारे उघडी होती. लोकांना फायनान्स वाला, बँकेवाला दारात आला की मनसेवाला आठवतो. जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा मनसेवाला कुठे जातो, तेव्हा का नाही मनसेवाला आठवत”, असा प्रश्न उपस्थित केला. ब्लू प्रिंट साहेबांनी आणली, पुण्यात मनसेचे आम्ही दोनच नगरसेवक आहोत. ती ब्लू प्रिंट कशी राबविली हे कात्रजमध्ये येऊन पहा. शंभरावर नगरसेवकांना जे जमले नाही ते आम्ही दोघांनी केले. पालिकेचा पुरस्कारही मनसेच्या नगरसेवकाला मिळाला, असे वसंत मोरे म्हणाले.

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1223681405065138/?flite=scwspnss

पुढे बोलताना म्हणाले, “सोळा वर्षांमध्ये १६ गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक. मला पुरस्कार देताना चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे होत्या. पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल, तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, मी गेली १५ वर्षे भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होतोय, असा किस्साही त्यांनी सांगितला”. घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला राज ठाकरेंच्या सभेला हजर राहिले असताना पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

राखी सावंतचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ
“जाती, धर्माचं राजकारण या देशात चालत नाही”- सुशीलकुमार शिंदे
IPL 2022 Playoffs : महाराष्ट्राबाहेर रंगणार फायनल..! ‘या’ दोन स्टेडियमची नावं झाली पक्की!
“आमचे खेळाडू IPLमध्ये आनंदानं खेळतायत आणि…”, श्रीलंकेच्या माजी कर्णधारानं नाव न घेता सुनावलं!
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा ‘हा’ व्हायरल फोटो पाहून चाहते झाले अवाक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!