मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे धोनीला 12 लाखांचा दंड आकारण्यात आला होता. बीसीसीआयच्या नियमानुसार प्रत्येक टीमला 90 मिनिटांमध्ये 20 ओव्हर पूर्ण करणे बंधनकारक आहे. चेन्नईच्या टीमला ही मर्यादा पाळता आली नाही, त्यामुळे बीसीसीआयनं धोनीच्या मॅच फिसमधील 12 लाख रुपयांचा दंड आकारला होता.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्ज या संघांदरम्यान झालेल्या सामन्यातही दोन्ही संघांनी वेळेत षटके पूर्ण केली नाहीत मग त्यांना दंड का केला गेला नाही, असा थेट सवाल माजी कसोटी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने केला आहे.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 4 धावांनी पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांकडून वेळेत षटके पूर्ण झाली नाहीत. मात्र, त्यांना कोणताही दंड केला गेला नाही.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात स्लो ओव्हर सामन्यात ज्या प्रकारे धोनीला स्लो ओव्हर साठी दंड आकारला होता, तसाच दंड या संघांच्या कर्णधारांनाही करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस, वीज कोसळून शेतकरी ठार
- ‘देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?’
- बीडमध्ये धुम स्टाईल चोरी, चालत्या टेम्पोतून ७२ हजारांचे एलईडी गायब
- पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना ‘नो एन्ट्री’, महापालिकेचा आदेश
- ‘जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला’


