Share

‘हा कुंभमेळा नाही तर करोना अ‍ॅटम बॉम्ब आहे’

Published On: 

🕒 1 min read

हरिद्वार: देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मात्र या बिकट परिस्थितीत देखील हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतल्यानंतर. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा भीती व्यक्त केली होती. यातच आता, या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ तर सोमवार आणि मंगळवारी या मेळाव्यात तब्बल हजार रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.

दरम्यान, या मुद्यावरून बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कुंभमेळ्यातील गर्दी पाहून नाराजी व्यक्त केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटर अकाऊंटवर कुंभमेळ्यातील अफाट गर्दीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘तुम्ही पाहात असलेला कुंभमेळा नाही तर करोना अ‍ॅटम बॉम्ब आहे. मला आश्चर्य वाटते की या एक्सप्लोजरचा दोष कोणाला द्यायचा’ या आशयाचे कॅप्शन रॅम गोपाल यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!