मुंबई : गेल्या चार दिवसांप्रमाणे आजचा दिवस देखील वादळी ठरला आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर दुसरीकडे सभागृहात माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोमणे मारले.
यानंतर पुढे जयंत पाटील म्हणाले कि, “तुम्ही अब्दुल सत्तार यांना मंत्री केलं. संदीपान भुमरे यांना मंत्री केलं. आता आमच्या संजय शिरसाट यांचं काय होणार? शिरसाट यांना काही चान्स आहे का? एका जिल्ह्यात दोन मंत्री झाले. संजय शिरसाट यांची कशी समजूत काढणार? हरिभाऊ रोठोड यांनी आरएसएसचं काम खूप वर्षे केलं. त्यांना एकदा विधानसभेचं अध्यक्ष केलं. त्यावेळी ते चिडले होते. औरंगाबाद जिल्ह्याची एक टोपी घेतली मग दुसरी टोपी का नाही घेतली? जी निष्ठेची टोपी आहे ती बाहेर ठेवली,” अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Nitin Gadkari | नितीन गडकरींची अफवा पसरवणाऱ्यांवर सडकून टीका, VIDEO शेअर करत सांगितले सत्य
- Aditya Thackeray | आदिवासी समाजाला न्याय द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी
- Karnataka | टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लीम गुंड’ ; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, जीभ कापण्याची धमकी
- Rupali Thombre “फडणवीस साहेब पुणे महानगरपालिका, पिंपरी…” रुपाली ठोंबरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
- Jayant Patil। पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

