🕒 1 min read
मुंबई : मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी कॅगतर्फे करण्यात यावी अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
रुपाली ठोंबरे यांची फोसबुक पोस्टः
मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची कॅगतर्फे चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून ती कराच, चौकशी झालीच पाहिजे, रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिका सत्पुरुषांच्या हाती असून, तेथे नीतीतत्त्वांच्या आधारावर कारभार चालतो, असे देवेंद्रजींना वाटते का? असा सवाल ठोंंबरे यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षाला तर अँटीकरप्शनने अटक केली होती, एकनाथ शिंदेंचे ठाणे व गणेश नाईकांची नवी मुंबई ही स्वच्छ कारभारासाठी जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे, त्यामुळे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड ची सुद्धा चौकशी आदेश देवेंद्र फडणवीस साहेब आज देतील अशी प्रामाणिक, कर्तव्यदक्ष नेते म्हणून अपेक्षा आहे, अशी पोस्ट रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Devendra Fadanvis | बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – देवेंद्र फडणवीस
- AAP | आप पक्षाचे आमदार नाॅट रिचेबल, महाराष्ट्र नंतर आता दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटस
- Aditya Thackeray | पोस्टरबाजीवरून आदित्य ठाकरे यांचे सत्ताधारी नेत्यांना प्रत्त्युत्तर म्हणाले…
- Rohit Pawar | पोलिसांना आपल्या गावात घर बांधण्यासाठी २५ लाखांचे कर्ज द्या – रोहित पवार
- Shivsena | “सर्वोच्च न्यायालय मध्ये आजच सुनावणी व्हावी” शिवसेना कडून सुप्रिम कोर्टात याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
