कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. महाडिक-पी एन पाटील यांच्या सत्ताधारी गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या निवडणुकीला स्थगिती द्यावी यासाठी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केला आहे. न्यायालयाने सत्ताधारी गटाची याचिका फेटाळून लावली आहे. २६ एप्रिल पर्यंत राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला होता. राज्य सरकारची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला आहे.
२ मे रोजी निवडणूक पार पडणार असून जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्ताधारी महाडिक-पी एन पाटील यांच्या गटाविरोधात राजर्षि शाहू शेतकरी आघाडीद्वारे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, मंत्री राजेंद्र राजेंद्र पाटील यड्रावकर आदी दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन दंड थोपटले आहेत. दरम्यान, ४ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचा नंबर द्या आम्ही त्यांना पार्टीसाठी आमंत्रित करू’ ; पुणे पोलिसांचे भन्नाट ट्वीट
- अजितदादांनी केली मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर सही ; उद्या होणार निर्णय
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानीचा चैञी पोर्णिमा उत्सव भाविकांविना साजरा
- आपली जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणं ही आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे – दानवे
- ऑक्सिजन प्लांटच्या कामासाठी एका नव्या पैशाचाही निधी मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

