🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडीतील निर्णय घेताना आम्हाला विचारले जात नसेल, आमच्याशी चर्चा केली जात नसेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि, “नाना पटोले नक्की काय म्हणालेत ते मला माहीत नाही, त्यामुळे मी त्यांना प्रत्युत्तर देणार नाही. पण महाविकास आघाडीत राहण्याची कुणालाही सक्ती नाही. भाजपाला विरोध करण्याची गरज असल्यामुळे आम्ही तीन पक्ष आलो आहोत आणि ज्यांना भाजपाला विरोध करायचा आहे, त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे.”
पुढे ते असेही म्हणाले कि, “राज्यात शिंदे-फडणवीसांचे जे अवैध सरकार स्थापन झाले आहे, त्याला विरोध करण्यासाठी सर्वजण एकत्र काम करत आहेत. आम्ही तिन्ही पक्षांनी आज एकत्रित बसून विरोधी पक्षाची भूमिका काय असावी यावर चर्चा देखील केली आहे. अंबादास दानवेंबद्दल सांगायचं झालं तर शिवसेना हा अधिकृत पक्ष आहे. कामकाज सल्लागार समितीवर त्यांचा प्रतिनिधी असणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांनी ते का टाळले हे लक्षात येत नाही.”, असे मत जयंत पाटलांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
- Priyanka Chaturvedi | “पुढचे १० दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र, पण त्यांनतर…”; प्रियंका चतुर्वेदी आक्रमक
- Uday Samant | उदय सामंतांनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन केले
- Amol mitkari | “मंत्रिपदासाठी रवी राणांना ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज”; मिटकरींचा खोचक टोला
- Sanjay Rathod । बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन मी शिवसेनेत आलो, स्मृतीस्थळी वंदन केल्यानंतर संजय राठोडांची प्रतिक्रिया
- Shahajibapu patil | “बहुमत असल्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळेल”; शहाजीबापू पाटलांचा दावा


