पुणे: पुण्यात शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्रमक झाले आहेत. धक्काबुक्की नंतर सोमय्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीच महापालिकेमध्ये गुंड पाठवले होते असा आरोप केला होता. या नंतर राजकारण चांगलेच तापले आहे.
पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आले होते, मात्र त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या धक्काबुककित त्यांना दुखापत झाली व त्यानंतर संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या सर्व प्रकरणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात माध्यमांसोबत बोलताना जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने त्यांना सुरक्षा पुरवायला हवी होती. ते कमी पडल्याने किरीट सोमय्यांचे प्रकरण धक्काबुक्की पर्यंत गेले, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच उद्धाव ठाकरेंवर जे आरोप लावण्यात आले आहेत त्यावर बोलताना पाटील म्हणाले, मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे असे आम्हाला आढळून आलेले नाही. तिथे स्थानिक नगरपालिकेत बाचाबाची झाली होती. त्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- अजित पवार आणि आदित्य ठाकरेंकडून मुंबईत विकास कामांची पाहणी
- “सातारच्या गादीचे ऋणानुबंध आजही…”, उदयनराजेंनी घेतली संभाजीराजेंची भेट
- शिवसेनेचे २०१७ साली ‘करून दाखवलं’ आणि आता २०२२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी नवीन घोषवाक्य
- “आईने खूप करुणा दिली, त्यामुळे मला कोरोना होणार नाही”, राज्यपालांचा दावा
- Goa Assembly Election 2022 : “..तर भाजपला ४० पैकी ४२ जागा मिळू देत”, फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याला राऊतांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

