🕒 1 min read
मुंबई : आज(११ फेब्रु.) राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद(Ramnath Kovind) यांच्या हस्ते दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी बोलत असतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आईने खूप करुणा दिली, त्यामुळे मला कोरोना होणार नाही, असा दावा केला आहे. तसेच कोरोना आल्याच्या काही महिन्यांनंतर माझ्याकडे लोकांनी येऊन अधिकाऱ्यांचे गौरव करण्यास सांगितले. जवळपास ५००० लोकांचा मी गौरव केला, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलत असतांना राज्यपाल म्हणाले की,‘हे फक्त राजभवन नाही तर जनतेचे भवन बनले पाहिजे. कोरोना काळात अनेक लोक माझ्याकडे येत होते. तेव्हा काही लोक बोलले की तुम्हाला कोरोना होईल, पण मी सांगितले की मला खूप करुणा मिळाली आहे.’ तसेच मलबार हिल, तिन्ही बाजूंनी समुद्र असून अनेक वर्षांपासून बाणगंगा देखील वास करते आहे. सिद्धिविनायक आणि मुंबा देवीची यावर कृपा आहे, असेही कोश्यारी यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- सोमय्यांना सीआयएसएफने संरक्षण दिले पाहिजे होते; जयंत पाटलांचा सल्ला
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक
- जामीन मिळूनही आशिष मिश्रा तुरुंगातच, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण
- कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Goa Assembly Election 2022 : “..तर भाजपला ४० पैकी ४२ जागा मिळू देत”, फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याला राऊतांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
