मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्या अटके संदर्भात महाविकास आघाडीचे नेते मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्याखाली निषेध आंदोलन करत आहेत.
मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्याखाली निषेध आंदोलन करत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या अटके संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांना झालेल्या अटकेत काही तथ्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच आता हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नाही, असं पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच होणार स्पष्ट? – वकील उज्ज्वल निकामांचे वक्तव्य
श्रीलंका मालिकेसाठी गंभीरचा सल्ला ; ‘या’ खेळाडूने पुजाराची जागा घ्यायला हवी
‘नवाब मलिकांच्या अटकेनंतर बहीण सईदा खान यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
‘गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार वठणीवर आणावं लागेल’ – चंद्रकांत पाटील
“द्रविडने साहाला काहीही चुकीचे सांगितले नव्हते”; माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

