Share

श्रीलंका मालिकेसाठी गंभीरचा सल्ला ; ‘या’ खेळाडूने पुजाराची जागा घ्यायला हवी

Published On: 

मुंबई: बीसीसीआयने मार्चच्या सुरुवातीला होणाऱ्या श्रीलंका मालिकेसाठी कसोटी संघ जाहीर केला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची निवड करण्यात आली नाही. या दोन्ही फलंदाजांवर गेल्या काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे दडपण होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत कामगिरी करण्यात या दोघांनाही अपयश आल्याने निवडकर्त्यांनी त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

भारतीय संघात पुजारा तिसर्‍या क्रमांकावर खेळतो. मात्र आता तो संघात नसल्याने त्याच्या जागी कोण येईल असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने याविषयी श्रेयस अय्यरचे नाव घेत सांगितले ” तो हुशार आहे. न्यूझीलँडच्या दौऱ्यावर त्याने ते दाखवून दिले आहे . प्रत्येकजण आपल्या पहिल्या कसोटी डावात शतक झळकावू शकत नाही.तो भारतासाठी परफेक्ट नंबर ३ फलंदाज ठरू शकतो. तो भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुजाराची जागा का घेऊ शकत नाही हे मला समजत नाही.”

श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी न्यूझीलँडविरुद्ध भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकले होते. दुसऱ्या डावातही त्याने अर्धशतक केले. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात अय्यरला रहाणे आणि पुजारा यांच्या बरोबरीने मार्ग काढावा लागला. दोघांनाही वगळल्यामुळे अय्यर हा एक निश्चित संघात खेळू शकतो. भारताचा नवा कसोटी कर्णधार रोहित शर्मा गंभीरशी सहमत होत अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवतो का हे पाहणे रंजक राहील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!