मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यानी आता नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
न्यायालयाने नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी कोठडी दिली आहे. आज नवाब मलिक यांचे कुटुंबीय दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरून ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहे नवाब मलिक यांची बहीण नगरसेविका डॉक्टर सईदा खान यांना विचारले असता आपल्या भावावर सूडबुद्धीने कारवाई होत आहे त्याच बरोबर कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. नवाब मलिक हे लढवय्ये आहेत, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही. न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार वठणीवर आणावं लागेल’ – चंद्रकांत पाटील
“द्रविडने साहाला काहीही चुकीचे सांगितले नव्हते”; माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
‘टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच नवाब मलिकांवर कारवाई’ – देवेंद्र फडणवीस
“धोनी माझा प्रेरणास्थान” ; भारतीय महिला क्रिकेटमधील स्टार रिचा घोषचे वक्तव्य
विराटचा ‘हा’ नवीन लूक बघून चाहते म्हणाले “हे तर रब ने बनादी जोडी २”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

