🕒 1 min read
मुंबई: भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी साहाला निवृत्तीचा विचार करण्यास सांगितले होते, असा खुलासा करताना रिध्दिमान साहाने मोठे विधान केले होते . तसेच द्रविडने त्याला आता कसोटी क्रिकेटसाठी त्याचा विचार केला जाणार नाही असेही सांगितले असल्याचे तो म्हणाला होता. मात्र साहाने द्रविडसोबतचे ते बोलणे चुकीच्या पद्धतीने घेतले, असे वक्तव्य माजी उत्तर विभाग निवडकर्ता आणि क्रिकेटपटू सरनदीप सिंग केले आहे.
सरणदीप सिंग यांनी द्रविडचे समर्थन करत सांगितले “मला वाटत नाही की द्रविडने काही चुकीचे म्हटले आहे, हीच वेळ आहे जेव्हा साहाने स्वतःबद्दल विचार करायला पाहिजे. तो ३७ वर्षांचा आहे.प्लेयिंग इलेव्हन मध्ये त्याची निवड होणार नाही मग आपल्याकडे तरुण यष्टिरक्षक असताना त्याला फक्त बेंचवर बसण्यासाठी संघात का निवडायचे आहे? पंत संघाचा पहिला प्राधान्य आहे आणि तो दीर्घकाळ खेळेल”
साहाला श्रीलंकेसाठीच्या कसोटी संघातून वगळण्यात आले होते. त्यातच एका “आदरणीय पत्रकाराने” त्याच्याशी मुलाखतीसाठी संपर्क कसा केला आणि संदेश लवकरच कसे धमकावले हे सगळे त्याने ट्विटरवर सांगितले होते. साहा यांने विशेष म्हणजे पत्रकाराचे नाव उघड केले नाही. यावरही सरनदीप म्हणाले: “साहाने यावर स्पष्टपणे बोलले पाहिजे तसेच पत्रकाराचे नाव देखील घ्यायला हवे. तो कोणाचे संरक्षण करत आहेत हे साहाच सांगू शकतात.”
महत्वाच्या बातम्या
- ‘टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच नवाब मलिकांवर कारवाई’ – देवेंद्र फडणवीस
- “धोनी माझा प्रेरणास्थान” ; भारतीय महिला क्रिकेटमधील स्टार रिचा घोषचे वक्तव्य
- विराटचा ‘हा’ नवीन लूक बघून चाहते म्हणाले “हे तर रब ने बनादी जोडी २”
- IND vs SL: श्रीलंका विरुद्ध पहिल्याच सामन्यात रोहित सामील होऊ शकतो विराट आणि धोनीच्या यादीत!
- IND vs SL: भारताची श्रीलंका विरुद्ध मालिका आजपासून सुरु होणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
