जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीकडून अटक करण्यात आलीय. त्यांच्या अटकेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ईडीने प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना अटक केली असून त्यांची ही अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असुन न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
जळगावात पत्रकारांशी अँड उज्ज्वल निकम बोलत होते. यावेळी निकम यांनी मलिक यांच्या अटकेनंतरच्या न्यायालयीन प्रक्रिया कशी असेल याबाबतही माहिती दिली. मलिक यांच्याविरोधात ईडीने सकृतदर्शनी पुरावा गोळा केला आहे. तो सबळ आहे का? प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऑक्टच्या कलम ५० नुसार प्रथम समंस पाठवावा लागतो. नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो. यानुसार ईडीने कारवाई केली आहे का? सबळ पुरावा असला तरच ईडी अटक करते. त्यामुळे ज्या पुराव्याच्या आधारावर मलिक यांना अटक झाली तो पुरावा किती सबळ आहे. हे न्यायालयात स्पष्ट होईल, असं अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
श्रीलंका मालिकेसाठी गंभीरचा सल्ला ; ‘या’ खेळाडूने पुजाराची जागा घ्यायला हवी
-
‘नवाब मलिकांच्या अटकेनंतर बहीण सईदा खान यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
-
‘गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार वठणीवर आणावं लागेल’ – चंद्रकांत पाटील
-
“द्रविडने साहाला काहीही चुकीचे सांगितले नव्हते”; माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
-
‘टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच नवाब मलिकांवर कारवाई’ – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
