मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी पहाटेपासून उडालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे.
फार मोठ यश मिळालं आहे. यापूर्वी असं मोठं यश कधी मिळालं नव्हतं. महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे, असं म्हणत जयंंत पाटलांनी गडचिरोलीतील पोलिसांनी केलेल्या कारवाई वरुन पोलिसांचं कौतुक केलं आहे.
ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नियोजनबद्धरीत्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच, नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांची चहुबाजूंनी कोंडी केल्याने ते हतबल झाले. तसेच या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांकडील मोठा शस्त्रसाठाही जप्त केला असल्याची माहितीही अंकित गोयल यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जय भीम’ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार?; राऊतांचा रोखठोक सवाल
- साठ वर्षांत प्रथमच विलीनीकरणाची एसटी कामगारांकडून मागणी- अजित पवार
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा फी मिळणार परत
- गडचिरोलीत पोलिसांची दमदार कामगिरी, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा!
- संजय राऊतांचा ‘आक्रोश मोर्चा’ परवानगीविनाच; पोलिसांकडून कारवाईचे संकेत


