🕒 1 min read
मुंबई : दुरचित्रवाणी व चित्रपट अभिनेते जय भानुशाली व त्याची पत्नी अभिनेत्री माही वीज यांनी लग्नानंतर दोघांनी खुशी आणि राजवीर या नावाची दोन मुले दत्तक घेतली होती. मात्र दोघांना जेव्हा स्वत:चे मुल झाले तेव्हा त्यांनी दत्तक मुलांकडे दुर्लक्ष झाले असा आरोप त्यांच्या चाहत्यांनी दोघांवर केला होता. या आरोपाला दोघांनी इन्स्ट्राग्राम वर पोस्ट करुन अपल्या चाहत्यांना उत्तर दिले आहे.
जय आणि माही दोघांना स्वतःचे मुल नव्हते. तोपर्यंत या कपलने मुलांचा चांगला सांभाळ केला. मात्र २०१९ मध्ये या कपलच्या आयुष्यात स्वतःच्या बाळाचे आगमन झाले आणि दत्तक घेतलेल्या मुलांवरुन त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. नंतर तर जय भानुशालीने दोन्ही दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या आई- बाबांकडे पाठवल्यामुळे चाहतेही भडकले होते. यांवर जय भानुशालीने चुप्पी सोडत भली मोठी पोस्टच चाहत्यांसह शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/CMCUzPzpayf/
या पोस्ट मध्ये तो म्हणाला की, राजवीर आणि खुशी दोघेही ताराच्या जन्माआधीपासून आमच्या आयुष्याचा भाग राहिले आहेत. आम्हाला ताराच नाही तर खुशी आणि राजवीर असे तीन मुलं आहेत. मुलांना त्यांच्या आई वडिलांकडे राहणे गरजेचे वाटले म्हणून दोघांना परत गावी पाठवल्याचे जय भानुशालीने म्हटले आहे. त्यामुळे उगाच अफवा पसरवू नका.त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही दूर झालेलो नाही. रोज व्हिडीओ कॉल, फोनवरून आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. त्यामुळे लांब राहिलो म्हणून काय झाले दोघेही ताराप्रमाणेच आमची मुलं आहेत. असेही स्पष्टीकरण नेटक-यांची बोलती बंद केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल ७५ रुपयांवर येणार? अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर
- सैराट फेम परश्याचा कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
- मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, मात्र… बीएमसी आयुक्तांचं महत्वाचं विधान
- राहुल गांधींना शाळेत पाठवण्यात यावं; भाजप मंत्र्याची टीका
- ‘बाबासाहेब आंबेडकरांची माणसाला माणसाशी जोडणारी नीती होती, तोडणारी नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
