नवी दिल्ली : स्वतंत्र मत्स्यपालन मंत्रालय बनवण्याच्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मागणीवर विभागीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लोकसभेत पुन्हा एकदा चांगलेच धारेवर धरलं आहे. ते म्हणाले की, ‘राहुल गांधींना शाळेत पाठवण्याची गरज आहे. तेव्हा त्यांना माहिती मिळेल की भारत सरकारमध्ये कोणकोणते विभाग काम करत आहेत. देशातील मत्स्यपालन क्षेत्राला चालणा देण्याच्या भाजप खासदार सुनिता दुग्गल यांच्या प्रश्वावर उत्तर देताना गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी २ फेब्रुवारीला लोकसभेत या विभागासंबंधी प्रश्न विचारले, पण काही दिवसांनी ते विसरुन गेले की देशात असा एक विभाग काम करत आहे,’ अशी टीका गिरिराज यांनी केली.
‘माहिती नाही राहुल गांधी विसरभोळे आहेत की काय, राहुल गांधी यांनी २ फेब्रुवारीला तारांकित प्रश्न केला होता, पण पुदुच्चेरी आणि कोचीमध्ये जाऊन त्यांनी मत्स्यपालन विभाग नसल्याचे म्हटले होते. मी सरकारमध्ये आलो तर यासाठी एक नवीन मंत्रालय बनवेन. राहुल गांधींना शाळेत पाठवण्याची गरज आहे. तेव्हाच त्यांना भारत सरकारमधील विभागांची माहिती मिळेल. मी संवैधानिक प्रश्व उपस्थित करत आहे,’ असं गिरिराज सिंह म्हणाले.
गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर मत्स्यपालन क्षेत्राच्या वाईट अवस्थेचाही आरोप केला. ते म्हणाले की, २०१४ पर्यंत राज्य करणाऱ्या सरकारने या विभागासाठी ३,६८२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. दुसरीकडे मोदी सरकारने या क्षेत्रासाठी मोठी तरतूद केली. त्यांनी सहा वर्षांच्या काळात या क्षेत्रासाठी ३२ हजार कोटी रुपये दिले आहेत. १९४७ ते २०१४ या काळामध्ये फक्त १०० लाख टन माशांचे उत्पादन झाले आहे. तर मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात १५० टन माशांचे उत्पादन केले आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना माहिती नाही की मत्स्यपालन विभाग कुठे आहे. मोदीजींनी २०१९ च्या पूर्वी दोन विभाग बनवले होते. त्यात ३२,५७२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. देशाच्या इतिहासात यापूर्वी असं कधीही झालं नाही. मत्स्यपालन क्षेत्राचा विकास १०.८७ टक्के दराने होत आहे, तर काँग्रेस शासनमध्ये ५.२७ टक्क्यांनी विकास होत होता. दरम्यान, राहुल गांधी यांनी पुदुचेरीमध्ये म्हटलं होतं की, काँग्रेसचे सरकार येताच एक वेगळे मत्स्यपालन मंत्रालय बनवलं जाईल. यावरुन भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाबासाहेब आंबेडकरांची माणसाला माणसाशी जोडणारी नीती होती, तोडणारी नाही’
- कोरोनाचा फास पुन्हा आवळतोय; सर्वात आधी नाईट क्लब बंद होण्याची शक्यता
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- बायकोच्या प्रत्येक दुखापतीसाठी नवराच जबाबदार-सुप्रीम कोर्ट
- सचिन वाझेंना अटक करा…फडणवीस संतापले; सभागृहात गदारोळ


