मुंबई: कर्नाटकात उडीपि आणि इतर शाळा आणि महाविद्यालयात सुरू असलेल्या हिजाब बंदी प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. कर्नाटकात हिजाब घालून आलेल्या मुलीनं शाळा आणि महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला. त्याप्रकरणी खटला उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून त्यावर निर्णय येणे अपेक्षित आहे. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांना यामुळे सात दिवसांची सुट्टी दिली असून कलम १४४ अंतर्गत संचार बंदी लागू केली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटत मध्ये म्हंटले की, मी आज पर्यंत हिजाब किंवा बुरखा याची बाजू घेतली नाही. मी आजही त्यावर ठाम आहे. पण त्याच वेळी मुलींच्या एका लहान गटाला घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांच्या टोळीचा मी निषेध करतो. हा पुरुषार्थ आहे का ? ही खेदजनक गोष्ट आहे. असे जावेद अख्तर म्हणाले. याप्रकरणी बॉलीवूड अभिनेते आपली मते देत आहेत. रिचा चड्डा, कमल हसन यांनी आपले मत दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत माटुंग्याच्या एम एम पी शहा महाविद्यालयात बुरखा बंदी केली आहे. तसेच पुणे येथे महात्मा फुले वाड्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने महिलांना घेऊन हिजाब बंडू विरोधात आंदोलन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पहिल्या क्रमांकावर हिंदू हित म्हणजेच राष्ट्रहित- मोहन भागवत
- IND vs WI: दीपक हुड्डासाठी ‘हा’ ठरला अविस्मरणीय क्षण; म्हणाला, “लहानपणीचे स्वप्न..”
- अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार – अजित पवार
- जामीन मिळताच नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; “…म्हणून मी सरेंडर झालो”
- ‘…सुरुवात नितीन गडकरींच्या घरापासून करा’; नाना पाटोलेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

