Share

गुपचूप लग्न केल्यानंतर बुमराहने पहिल्यांदा सांगितली त्याची ‘लव्ह स्टोरी’; २०१९ विश्वचषकातून झाली होती सुरुवात

Published On: 

मुंबई: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागच्या वर्षी अँकर असलेल्या संजना गणेशनसोबत लग्नगाठ बांधली होती. ऑस्ट्रेलिया दौरा सुरु असताना बुमराहने अचानकपणे दौरा सोडला होता. ज्यानंतर त्याने लग्न केले असल्याचे समोर आले होते. त्यांच्या लग्नाला वर्ष झाल्यानंतर आता बुमराहने त्याची लव्ह स्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि संजना गणेशन (sanjana ganeshan) यांचा दास्तान-ए-मोहब्बत खूपच मनोरंजक आहे. या दोघांचे प्रेम इतरांसारखे सुरू झाले नाही. खरं तर, बुमराह-संजना एकमेकांना आधीपासून ओळखत होते. पण ते कधीच एकमेकांशी बोलले नाहीत, कारण दोघेही एकमेकांना अहंकारी समजत होते. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच बुमराह आणि संजना यांच्यात संवाद झाला होता. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांच्या प्रेमकथेत २०१९चा विश्वचषक हा टर्निंग पॉइंट ठरला, जिथे बुमराहची संजनाची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर पाहता पाहता दोघांमध्ये मैत्री झाली.

https://www.instagram.com/p/CMb2BtxHjgD/?utm_medium=copy_link

जस्सी आणि संजनाच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही आणि गेल्या वर्षी दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. या सर्व गोष्टी बुमराहने दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत. “मी संजनाला अनेकदा पाहिलं, पण आमच्या एकमेकांसोबत अशाच समस्या होत्या. तिला वाटले की मी गर्विष्ठ आहे आणि मला वाटले की ती खूप गर्विष्ठ आहे, म्हणून आम्ही कधीच बोललो नाही.” बुमराहचे नाव आधी दाक्षिणात्य अभिनेत्रीशी जोडण्यात येत होते. मात्र जस्सीने सगळ्यांना आश्चर्यचा धक्का देत संजनाशी गेल्या वर्षी पंजाबी पद्धतीने लग्न केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!