🕒 1 min read
मुंबई: विराट कोहलीने शेवटी कसोटी कर्णधार पदाचाही राजीनामा दिल्यानंतर आता नवीन कर्णधार कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. एकदिवसीय आणि टी ट्वेन्टीचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळत आहे. तो कसोटी कर्णधार बनणार का याबाबत अजूनही बीसीसीआयने कोणतेही वक्तव्य केले नाही. मात्र सध्या भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कर्णधार व्हावा अशी चर्चा होती. दरम्यान भारतीय संघाचे माजी गोलदांजी कोच भरत अरुण यांनी या संबंधी वक्तव्य केले आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व का करू शकत नाही, हे भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी स्पष्ट केले आहे. “बुमराहच्या कर्णधारावरही चर्चा झाली. गोष्ट अशी आहे की तो सर्व कसोटी सामने खेळू शकेल का? वर्कलोड मॅनेजमेंट असल्याने बुमराह सर्व कसोटी खेळणार आहे का? मालिकेच्या मध्येच त्याला ब्रेक घ्यावा लागला तर? मग पुन्हा नेतृत्व बदल करावा लागेल. कर्णधारला दुखापत झाल्याशिवाय मालिकेच्या मध्ये कर्णधार बदलणे योग्य नाही असे मला वाटते.”
यावेळी त्यांनी फिरकीपटू अश्विन सुद्धा कर्णधारपदासाठी अयोग्य असल्याचे सांगितले. भविष्यात अशी वेळ असू शकते जिथे अश्विनला खेळण्याची गरज नसेल त्यामुळे कसोटी कर्णधार होण्यासाठी फलंदाजाला प्राधान्य दिले जाईल. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाल्यानंतर कोहलीने पद राजीनामा दिला. कसोटीचे कर्णधारपद रिक्त राहिले आहे. तेव्हापासून निवड समिती आणि बीसीसीआयने नवीन कर्णधाराची नियुक्ती केलेली नाही. नवीन कर्णधाराचा शोध अजूनही सुरूच आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात नवीन प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीची सोय लवकरच उपलब्ध होणार ..
- “वाईनप्रमाणेच हातभट्टी वाईन, मोहाच्या फुलांची वाईन विक्रीला मूभा द्या”, सदाभाऊंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “पंजाबमध्ये हायकमांडला नेहमी कमकुवत मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायचा असतो”
- धक्कादायक! मंदिरात नारळ फोडल्याने लातुरात मागासवर्गीय कुटुंबावर गावाचा बहिष्कार
- “राहुल द्रविडने सौरव बद्दल…” ; माजी व्यवस्थापकाचा धक्कादायक खुलासा

