🕒 1 min read
पुणे: पुणे शहर हे महाराष्ट्र्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई शहरापेक्षा पुणे शहर आता आकारमानाने मोठे शहर झाले आहे. मुंबईची लोकसंख्या जास्त असली तरी मागील २ वर्षात पुणे शहरात आधी ११ आणि आता २३ गाव समाविष्ट झाल्याने पुणे शहर हे राज्यातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
मात्र राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई पेक्षा पुणे शहरात हव्या त्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा विकास झाला नाही. पीएमपीएल हा एकच पर्याय पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतूक पण उपलब्ध आहे. पुणे मेट्रो पण येत्या काही वर्षात शहरात तीन मार्गांवर धावणार आहे. पुणे शहरातील एकमेव सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय असणारी पीएमपीएल आता पुणेकरांना नवीन स्वरूपात दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय. श्री. उद्धव ठाकरे यांना पण पुण्याच्या या प्रकल्पात विशेष रस निर्माण झाला आहे.
ही पुणेकरांसाठी नवीन सार्वजनिक वाहतुकीची विशेष सोय म्हणजे ‘पीएमपीएल’ ची डबल डेकर बस होय. तब्बल २० वर्षांनंतर डबलडेकर बस पुण्यात पुनरागमन करण्यास सज्ज झाल्या आहेत. तब्बल २० वर्षांनंतर पुणे शहरात पीएमपीएलची डबल डेकर बस पुनरागमन करणार आहे, विशेष म्हणजे या पीएमपीएलच्या डबल डेकर बस प्रकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पण विशेष रस आहे.
परंतु पुण्यात पुन्हा डबल डेकर बस सुरु करण्याची चर्चा सध्या प्राथमिक टप्यात असल्याची माहिती पीएमपीएलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही डबल डेकर बस इलेकट्रीक बस असणार आहे, त्यामुळे पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होणार असल्याची माहिती पण पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “वाईनप्रमाणेच हातभट्टी वाईन, मोहाच्या फुलांची वाईन विक्रीला मूभा द्या”, सदाभाऊंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- धक्कादायक! मंदिरात नारळ फोडल्याने लातुरात मागासवर्गीय कुटुंबावर गावाचा बहिष्कार
- “राहुल द्रविडने सौरव बद्दल…” ; माजी व्यवस्थापकाचा धक्कादायक खुलासा
- सत्तेचा गैरवापर करायचाच असता तर नितेश राणे यांना रुग्णालयात नव्हे तर तुरुंगातच ठेवले असते- दीपक केसरकर
- U19WC: भारत विरुद्ध इंग्लंडचा अंतिम सामना आज रंगणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
