Share

जनआर्शिवाद यात्रा : डॉ. भागवत कराड येण्याआधीच स्थानिक नेत्यांनी भागवली सत्काराची हौस

Published On: 

औरंगाबाद : केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्याचा दौरा करत ‘जनआर्शिवाद’ यात्रा काढली आहे. बीड मधून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप डॉ. कराड राहत असलेल्या औरंगाबाद शहरात होत आहे. शुक्रवारी दुपारी कराड औरंगाबाद शहरात पोहोचणार असल्याने स्थानिक भाजप नेत्यांनी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. मात्र, डॉ. कराड यांना यात्रेदरम्यान शहरात दाखल होण्यास उशीर झाला. त्यामुळे मिळालेला वेळ सत्कारणी लावत स्थानिक नेत्यांनी ‘जनआर्शिवाद’ यात्रेच्या रथावर चढत सत्काराची हौस भागवली.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यासाठी डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची ‘जनआर्शिवाद’ यात्रा बीडमधून निघण्यास विरोध होत होता. अखेर पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत यात्रेची सुरूवात गोपीनाथगडावरुन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. अखेर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरूवात झाली. बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना मार्गे आता ही यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाली आहे.

मात्र, वेळेचे नियोजन कोलमडल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी ‘जनआर्शिवाद’ यात्रेचा रथ फोटोसेशनसाठी वापरत सत्कार कार्यक्रम उरकला. यामध्ये आमदार अतुल सावे, भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरीये यांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!