मुंबई – केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून केली होती. दरम्यान, नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या ठिकाणाचं शुद्धिकरण केलं होतं.
त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. शुद्धिकरण करायचंच असेल तर आता ते शिवसेनेचं करावं लागेल, अशी टीका या घटनेनंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तर आता बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धिकरण करणाऱ्या शिवसेनेला भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
स्व. बाळासाहेबांच्या स्मारकावर ते कोण आडवे येणार होते त्यांच्यातला एक सुद्धा दिसला नाही. धमकीची वार्ता राणेंसोबत करायची नाही, धमक्यांना भीक घालत नाही आम्ही. निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो. औकातीत राहायचं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 20, 2021
स्व. बाळासाहेबांच्या स्मारकावर ते कोण आडवे येणार होते त्यांच्यातला एक सुद्धा दिसला नाही. धमकीची वार्ता राणेंसोबत करायची नाही, धमक्यांना भीक घालत नाही आम्ही. निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो. औकातीत राहायचं असा इशारा राणे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियासाठी धोकादायक इंग्लंडचा खेळाडू संघाबाहेर, ‘हे’ आहे कारण
- हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा ‘हा’ निर्णय रद्द करा; शिवसेनेची नागरिकांसह नगरविकास मंत्र्यांकडे धाव!
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान
- “विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”
- मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरला राज्यभरात कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन करणार-विनायक मेटे


