बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे माहिती सध्या मिळत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला आहे.
समृद्धी महामार्गावर काम करणारे बिहारी मजूर असल्याचं वृत्त समोर येत आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असलायची माहिती सध्या मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातल्या गंभीर जखमी मजूरांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नागपूर ते मुंबई यादरम्यान होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी एक टिप्पर काही मजूर व त्यात लोखंडी सळई घेऊन काम सुरू असलेल्या दिशेने जात होते. यावेळी समोरून आलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटले. परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यातच अनियंत्रित टिप्पर रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाले. यामध्ये असलेले मजूर दूरवर फेकल्या केल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमींवर उपचार करण्यासाठी तत्काळ जालना येथे हलविण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न – डॉ. भारती पवार
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- पुणे पोलिसांची दादागिरी! दुचाकीस्वाराला गाडीसह टेम्पोत भरले, नागरिकांमधून संताप
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

