नांदेड : यापूर्वी सगळ्या मुक मोर्चाला लोकप्रतिनिधी आले. नांदेडच्या मुक मोर्चाला इथले बहूतांश आमदार, लोकप्रतिनिधी आले पण नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण आले नाहीत. नांदेडचे सुपूत्र दिल्लीत येतात. सर्वांना भेटतात. पण मला का भेटले नाहीत, अशी माहिती देत खासदार छत्रपती संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांना टोला लगावला.
संभाजीराजे यांनी नांदेडमधील मराठा मोर्चाला संबोधित करताना काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. ‘राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, तेव्हा त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा ९६ टक्के वाले मराठे आहोत’, अशी टीका केली.
आपण संसदेतही मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडली हे सांगताना संभाजीराजे म्हणाले, मी संसदेतही मराठा आरक्षणाविषयीची भूमिका मांडण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मला बोलायची परवानगी दिली नाही. त्यावेळी मला कळलं की भांडल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे, आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे. पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली. त्या खासदारांचेही मी आभार मानतो.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूत म्हणुन जनतेची सेवा करणार -कराड
- आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न – डॉ. भारती पवार
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- पुणे पोलिसांची दादागिरी! दुचाकीस्वाराला गाडीसह टेम्पोत भरले, नागरिकांमधून संताप
- “विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

