Share

कोकण पुरामुळे बुडत असताना स्वतःला कोकणचा नेता म्हणवून घेणारे कुठे होते? – भाई जगताप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री सध्या राज्यातील विविध भागात जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. पण, या सर्वांमध्ये चर्चेत आणि केंद्र स्थानी असलेली यात्रा म्हणजे नारायण राणे यांची. नारायण राणे थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अर्थात कोकणात जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसून येत आहेत यामुळेच राणेंच्या यात्रेची जोरदार चर्चा होत आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे, अशी राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा राहिली आहे. यातच आता खुद्द राणे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर विकासाचे मुद्दे मांडत टीका करताना दिसून येत आहेत. ही टीका आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलीच झोंबत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर हल्लाबोल केला आहे. स्वतःला कोकणचा नेता म्हणणारी लोक जन आशीर्वाद यात्रेचे नाटक करत आहेत! जेव्हा लोक ऑक्सिजन आणि रक्ताशिवाय मरत होते तेव्हा ते कुठे होते? कोकण पुरामुळे बुडत असताना ते कुठे होते? जेव्हा लोकांना लस मिळत नव्हती तेव्हा ते कुठे होते? अश्या प्रश्नांचा भडीमार जगताप यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!