Share

‘जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना पसरणार’ ; अजित पवार केंद्र सरकारवर बरसले

Published On: 

पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला नव्याने ४ मंत्रीपदे देण्यात आली असून त्यातील एक कॅबिनेट तर उर्वरित तीन हे केंद्रीय राज्यमंत्रिपदे आहेत. ही मंत्रीपदे देण्यात आल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या भागात भाजपने जन आशिर्वाद यात्रा सुरु केली आहे. कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जनआशीर्वाद यात्रा नसून ‘जनअपमान यात्रा’ अशी टीका याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली होती.

दरम्यान आता या यात्रेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीकास्त्र डागलेले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णांबाबत गृहमंत्रालय देखील चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र समोर आल्यानंतर अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एकीकडे पत्र पाठवून योग्य ती काळजी घेण्याबाबत आदेश द्यायचे आणि दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा काढून लोकांची गर्दी जमवायची याबाबत अजित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

एकीकडे केंद्र सरकार सांगतेय कोरोना महामारीची काळजी घ्या, गर्दी टाळा तर दुसरीकडे आपल्याच नवीन चार मंत्र्यांना ते सांगतात यात्रा काढा. त्यामुळे कोरोना वाढल्यास त्याला कोण जबाबदार आहे. याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा. असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!