मुंबई : कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे.
तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील जनतेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी सणांमध्ये काळजी न घेतल्यास पुन्हा निर्बंध लावू असा इशारा त्यांनी दिला आहे. पवार म्हणाले, केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तिथे लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. एक सण मोठ्या प्रमाणात साजरा केला.
त्यामुळे आता तिथे प्रचंड कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याने पुन्हा निर्बंध लावावे लागले आहेत. महाराष्ट्रात गोपाळकाला, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण ओळीने येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा मग निर्बंध लावावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
दरम्यान राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचा सांगून त्याला दुजोरा दिला आहे त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राच्या अनुषंगाने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावा ; केंद्राची महाराष्ट्राला सूचना
- ‘वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्याने जीव दिला, अन् अनिल परब नसते उद्योग करतोय’, निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘तुम्ही बिनबापाचे आहात काय?..,’ संजय राऊतांनी राणेपुत्रांना शब्दांनी झोडपले
- ‘पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते’, पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
- ‘संजय राऊत बोगस माणूस, त्याचा जिथे दिसेल तिथे ‘करेक्ट’ कार्यक्रम करूत’, निलेश राणेंचा इशारा


