Share

भारत ४० वर्षानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) सत्राचे आयोजन करणार!

Published On: 

मुंबई: भारताने चीनमधील बीजिंग येथे झालेल्या १३९ व्या IOC सत्रादरम्यान शनिवारी बिनविरोध शर्यतीत मुंबईत २०२३ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) सत्र आयोजित करण्याचे अधिकार जिंकले आहे. देशाचा प्रस्तावाचे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता (बीजिंग 2008, नेमबाजी) अभिनव बिंद्रा, IOC सदस्य नीता अंबानी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांचा समावेश असलेल्या भारतीय शिष्टमंडळाने IOC सदस्यांना सादरीकरण केले. बीजिंगमध्ये चालू असलेल्या हिवाळी ऑलिम्पिकच्या बरोबरीने या सत्राचे आयोजन केले गेले होते.

भारतातील आयओसीचे हे दुसरे सत्र असेल. देशाने १९८३ मध्ये नवी दिल्ली येथे शेवटचे IOC सत्र आयोजित केले होते. त्याला आता ४० वर्ष ओलांडली आहेत. “40 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ऑलिम्पिक चळवळ भारतात परत आली आहे. २०२३ मध्ये मुंबईत आयओसी सत्राचे आयोजन करण्याचा मान भारताला सोपवल्याबद्दल मी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची खरोखर आभारी आहे,” अशा नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

IOC (Internation Olympic committee) सत्र ही IOC च्या सदस्यांची सर्वसाधारण सभा असते.हि सभा IOC चे सर्वोच्च अंग आहे आणि त्याचे निर्णय अंतिम असतात. एक सामान्य सत्र वर्षातून एकदा आयोजित केले जाते, तर असाधारण सत्र अध्यक्षाद्वारे किंवा किमान एक तृतीयांश सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार बोलावले जाऊ शकते. IOC मध्ये मतदानाचा हक्क असलेले एकूण १०१ सदस्य आहेत. याव्यतिरिक्त, ४५ मानद सदस्य आणि एक सन्माननीय सदस्य आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार नाही. सदस्यांव्यतिरिक्त, ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांचे (उन्हाळी आणि हिवाळी क्रीडा शाखा) वरिष्ठ प्रतिनिधी (अध्यक्ष आणि महासचिव) देखील IOC सत्रात सहभागी होतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!