Share

जालना : लॉकडाऊनचा निर्णय गुरुवारी; हॉटेल्स, खाद्यपदार्थ पदार्थांची दुकाने बंद

Published On: 

जालना : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रूग्ण संख्येमध्ये खुप मोठी वाढ होत आहे. या वर प्रतिबंध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये सध्या लॉकडाऊन होणार नाही. परंतू गुरुवारी या बाबत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.

मंगळवारपासून हे बंद

ज्या ठिकाणी तोंडावरचा मास्क काढावा लागतो. अशा प्रकारची सर्व व्यवस्थापने मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यात चहा, भेळपुरी, पाणीपुरी गाडे, छोटी हॉटेल्स, या दुकानांचा समावेश असणार आहे. ज्या हॉटेल मध्ये स्वतंत्र स्वयंपाकाचे गृह आहे, या लॉजिंग अँड बोर्डिंगची व्यवस्था असलेल्या हॉटेलला यामधून वगळले आहे. अशा हॉटेल्समध्ये थांबणारे ग्राहक हे सामान्य माणसांच्या तुलनेमध्ये  लोक संपर्कामध्ये कमी येतात.  स्वत:च्या खोल्यात जाऊन ते राहतात. स्वयंपाक गृहात येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ देखील कमी असते. त्यामुळे हा निर्णय घेतला. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विविध कारखान्यांमध्ये कोरानाची तपासणी बंधनकारक केली आहे.

शुक्रवारपासून लॉक डाऊनची शक्यता ?

आज सर्वांनी लॉक डाऊनला विरोध केला आहे. तरी, शुक्रवारपासून तीन दिवसाचा लॉकडाउन जाहीर करावा अशा सूचनाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी केल्या. त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार, असा तीन दिवसाचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता काही अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!