जालना : एप्रिल महिन्यात दीपक हॉस्पिटलमध्ये भाजयुमोच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होताच, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशी नंतर पाच जणांचे निलंबन केले. परंतु, युवकावर काठ्या तोडणाऱ्या पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या वर मात्र, वरिष्ठांचे आदेश आल्यावर कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सांगितले.
दीपक हॉस्पिटलमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा व्हिडीओ काढला म्हणून दवाखान्यातच भाजयुमोचे शिवराज नारीयलवाले यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचे आरोप पोलिसांवर करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत करण्यात आली होती. त्यात एका उपनिरीक्षकासह पाच जणांवर चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
लाच घेतल्याच्या प्रकरणात निलंबित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या वर पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. त्यांच्या सोबत मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची चौकशी सुरू असून, वरिष्ठांच्या आदेशानंतरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सांगितले. विशेष म्हणजे महाजनांच्या कार्यक्षेत्रात ही मारहाण झाली असताना त्यांची साधी उचलबांगडी देखील करण्यात आली नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारने जनगणना करून ओबीसींना पूर्ववत आरक्षण द्यावे’, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘मोदीजी, ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

