मुंबई : आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी मंत्रायलासमोर एक खळबळजनक प्रकार घडला आहे. जळगावच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मरीन लाईन पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर काही वेळानेच सुनील गुजर यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित नागरिक, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचे प्राण वाचले.
जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुकचे सुनिल दामु गुजर या व्यक्तीने मंत्रालयासमोर आज रविवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या अर्जात या शेतकऱ्याने पोलिस प्रशासनाच्या कारभाराला आणि नाकर्तेपणाला कंटाळुन मंत्रालयासमोर आत्मदहन करत असल्याचे म्हटले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून नातेवाईकांची मदत घेऊन सोयाबीन आणि मका खरेदीचा व्यवसाय या व्यक्तीने सुरू केला. तसेच व्यवसायातही चांगली प्रगती केली होती.
त्यामुळेच शेतकऱ्यांनी गुजर यांच्यावर विश्वास टाकला. या व्यवसायासाठी राहते घर गहाण ठेवले. मार्केटमधून उसणे पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात मका आणि सोयाबिन खरेदी केला. पण या व्यवसायातील संबंधित एका तक्रारीमध्ये पोलिसांनी एकतर्फी निर्णय दिल्याची गुजर यांची तक्रार आहे. पोलिसांनी या प्रकरणात आर्थिक तडजोड केली आहे. त्यामुळेच पोलिसांच्या नाकर्तेपणाला कंटाळूनच मी आत्मदहन करत आहे असेही गुजर यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
- ‘फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच ‘फाळणी भयस्मृती दिन’ साजरा करणार’
- तिरंगा फडकला! लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

