पुणे : राज्य शासनाने सोमवारी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे नियम कायम ठेवले आहे. पण मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे. आता यावरूनच भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईसह 14 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र पॉझिटिव्हीटी रेट 5% खाली नोंदवला गेला असतानाही पुण्यात निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले. राज्य शासनाची भूमिका पुणेकरांवर अन्याय करणारी आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री साहेब, पुण्याबद्दल इतका आकस का? एकीकडे मुंबई चे निर्बंधात शिथिलता आणून तिथे व्यापारी व दुकानदारांना सूट दिली आहे मात्र पुण्याचे निर्बंध जैसे थे ! पुण्याचा पोसिटीव्ह रेट 4% पेक्षा कमी असून देखील पुण्याबाबत दुजाभाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी 4 टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? सलग महिनाभर पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असून या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सलामीवीर मंयक अग्रवाल बाहेर
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या


