Share

मोहालीत जडेजाने केला मोठा विक्रम, येथे या अगोदर दोन वेळा केलाय असा कारनामा

Published On: 

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोहालीत एक मोठा इतिहास रचला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने नाबाद १७५ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच बरोबर जेव्हा त्याच्या हातात चेंडू आला. तेव्हा त्याने ९ विकेट्सही घेतल्या.

९० वर्षानंतर भारताच्या इतिहासात जडेजा तिसरा खेळाडू बनला आहे. ज्याने एका कसोटी सामन्यात १५० पेक्षा अधिक धावा आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात ५७४ धावांवर डाव घोषित केला.

श्रीलंका संघ पहिल्या डावात १७४ धावांवर ऑलआउट झाला. त्यामुळे त्यांना फॉलोऑन मिळाला. श्रीलंका दुसऱ्या डावातही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. व दुसरा डावही १७८ धावांतच संपला. जडेजाला या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. जडेजाने मोहालीत खेळलेल्या मागील दोन कसोटी सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा मान मिळवला होता. त्यामुळे त्याने या मैदानात प्लेअर ऑफ द मॅचची हॅट्रिक मारली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!