🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे युक्रेनच्या लष्करापेक्षा कित्येक पटीने ताकदवान आहे. तरी युक्रेन रशियाच्या बलाढ्य लष्कराचा सामना करत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे एकटे रशिया विरुद्ध खिंड लढवत आहेत. रशियाचा पाडाव करण्यासाठी जगभरातील महत्वाच्या देशांकडून कशी मदत मिळेल याचा प्रयत्न सुद्धा वोलोडिमिर झेलेन्स्की करताना दिसत आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आम्ही युक्रेनला थेट मदत करणार नाही ; मात्र युक्रेनच्या लष्कराला शस्त्रास्त्रांची जेवढी मदत लागेल ती करायला तयार आहोत अशी घोषणा मागच्या आठवड्यात केली आहे. कालच इस्राईलचे प्रधानमंत्री नफ्ताली बेनेट यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रत्यक्षात भेट घेतली. तर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जगातील अनेक आजी आणि माजी नेते रशिया आणि युक्रेनमधील युद्ध कश्या प्रकारे थांबवता येईल याचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्यातच आज अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत एक गमतीशीर विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील मीडियाशी संवाद साधताना म्हणाले कि, ‘ अमेरिकेने रशिया आणि युक्रेनमधील युद्धात भाग घेतलाच पाहिजे, जगातील माणुसकी जिवंत ठेवायची असेल तर अमेरिकेने रशियावर बॉम्बचा वर्षाव केलाच पाहिजे. परंतु रशियाला आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आपण आपल्या लढाऊ विमानांवर चीनचा झेंडा लावून रशियावर बॉम्बचा वर्षाव करायला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- “मी पुन्हा येईन.. आम्ही येऊ दिलं तर ना”- शरद पवार
- PM Modi Pune visit: पुणेकरांच्या सेवेत मोठ्या प्रमाणात ‘इलेक्ट्रिक बसेस’ दाखल; मोदींच्या हस्ते लोकार्पण
- CISF च्या ५३व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची हजेरी.
- स्मृती मानधनाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केला मोठा विक्रम, ठरली चौथी भारतीय
- पेट्रोल डिझेलच्या किमतींवरून ओवेसींची नरेंद्र मोदींवर टीका ; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
