पुणे : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. मोदींच्या या छोटेखानी दौऱ्यात त्यांनी महत्वाच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. पहिल्यांदा मोदी यांनी पुणे महापालिका भवनाच्या आवारात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण केले. नंतर त्यांनी बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. त्यानंतर ते कोथरूड येथील एमआयटी कॉलेजच्या मैदानात अजून काही सेवांचे लोकार्पण करायला गेले.
नरेंद्र मोदी यांनी आज सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी 150 इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्याचे लोकार्पण व बाणेरमध्ये अत्याधुनिक ई-बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने या इलेट्रीक बसेस बनवल्या आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड ही मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड( MEIL) ची उपकंपनी आहे. नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत आभासी पद्धतीने या १५० इलेक्ट्रिक बसच्या सेवेचे लोकार्पण केले.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. सध्या आपल्या देशातच नव्हे तर जगभरात पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे वाहनांची संख्या सुद्धा वाढत आहे. जस जशी वाहनांची संख्या वाढत आहे तस तसे प्रदूषण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे सामान्य लोकांना जेवढया जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करता येईल तेवढा त्यांनी करावा असे देखील नरेंद्र मोदी आज म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- “…पूर्वी लोकार्पणाची शाश्वती नव्हती”; मोदींचा काँग्रेसला टोला
- Women’s world cup : पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला इतिहास
- PM Modi Pune Visit: मेट्रोवरून अजित पवारांची नरेंद्र मोदींना खास विनंती; म्हणाले…
- पंतप्रधानांनी मदतीची भूमिका अशीच ठेवावी- अजित पवार
- पुणे मेट्रोचा पहिला प्रवासी होण्याचा मान मोदींना; मोबाईलवरुन काढले तिकीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

