Share

IND VS SL : जडेजाच्या फिरकी समोर श्रीलंका नतमस्तक, भारताचा १ डाव २२२ धावांनी दणदणीत विजय

Published On: 

नवी दिल्ली : भारत श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने नाबाद १७५ धावांची सर्वश्रेष्ठ खेळी केली. जडेजाने या खेळीत १७ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १७४ धावांवर ऑलआउट झाला होता. या डावात निसांकाने एकाकी झुंज दिली परंतु कोणत्याही खेळाडूची त्याला साथ मिळाली नाही. त्याने या डावात नाबाद ६१ धावा केल्या. त्यानंतर संघाला फॉलोऑन मिळाल्याने दुसऱ्या डावाला सुरुवात करावी लागली परंतु दुसऱ्या डावातही श्रीलंकन फलंदाज अपयशी ठरले. दुसऱ्या डावात यष्टीरक्षक निरोशन डीकवेलायाने सर्वाधिक नाबाद ५१ धावांची खेळी केली.

भारताकडून सर्वाधिक रवींद्र जडेजाने नाबाद १७५ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ९६, आर अश्विन ६१ व हनुमा विहारीने ५८ धावांचीची खेळी केली. भारताकडून गोलंदाजी करताना पहिल्या डावात जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स, तर बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या तर तर मोहम्मद शमीने २ विकेट घेतल्या.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!