उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेल्या पक्षांतराविषयी पवार म्हणाले कि, जे राष्ट्रवादीला सोडून गेले ते सोडून गेले, आता त्यांची चिंता करण्याची गरज नाही. उस्मानाबादच्या पाणी प्रश्नावरही त्यांनी आपली मते मांडली. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर पवारांना आपल्या खुमासदार शैलीत टीका केली.
फडणवीसांच्या पुन्हा येईनवर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले कि, संकट काळात राजकारण करायचं नसतं. पण काही लोकांना जमत नाही, ते कुठेही राजकारण करतात. निवणडणूक होण्याच्या आधीच, निकाल लागण्याच्या आधीच मी येणार, मी येणार, असे सांगत होते. पण त्यांना आम्ही येऊच दिलं नाही, असा खोचक टोला पवार यांनी फडणवीसांना लगावला.
महाविकास आघाडी यशस्वी
महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना पवार म्हणाले, ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. ही आघाडी सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करत आहे. समाजातील लोकांनी 52 वर्ष सतत काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांचे भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. या लोकांनीच मला चार चार वेळा मुख्यमंत्री केले. मी 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा मी काही नाही, मी कधीच थकणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:


