Share

बीस साल बाद! तब्बल वीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लालपरीचे दर्शन

Published On: 

🕒 1 min read

लातूर : बेलकुंडतील गावकऱ्यांनी एक, दोन नव्हे तर चक्क २० वर्ष एस.टी बसची प्रतीक्षा केली आहे. शेवटी आता कुठे या प्रतिक्षेला फळ मिळाले आहे. औसा तालुक्यातील बेलकुंड हे जवळपास ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात पूर्वी सोलापूर आणि लातूरला जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसेस येत असत; मात्र जवळपास २० वर्षांपासून गावात बस येणे बंदच झाले होते. परिणामी, तालुक्याला शिक्षणासाठी, कार्यालयीन, खासगी कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची, विद्यार्थ्यांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड होत होती.

बेलकुंड येथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना औसा अथवा लातूरला जाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करत बेलकुंडमोड गाठावे लागत हाेते. मोडवर थांबूनही अनेक बसेस उड्डाण पुलावरून जात असल्याने प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत होते. दरम्यान, सरपंच विष्णू कोळी यांनी यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला हाेता. गत २० वर्षांपासून होत असलेल्या बसच्या मागणीकडे महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंगळवारपासून औसा-बेलकुंड ही नवीन बससेवा सुरू केली आहे. यातून प्रवाशांची सोय होणार आहे.

गावात बस येताच जल्लोष
गावात बस दाखल झाल्यानंतर फटाके फोडून ‘लालपरी’चे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी बसची पूजा करून बसचालक अनिल गोरे, वाहक एम.एच. नागरगोजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील जेष्ठ मंडळी महिला व मुलांचा सहभाग होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!