Share

‘महाराष्ट्रात विरोधी पक्षाला जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बुधवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली होती. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती.

यातच बुधवारी अधिवेशनाची सुरुवातीलाच विरोधी पक्षाने महाविकास आघाडीवर जोर धरून ठेवला. अधिवेशनाची शेवट वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याने आणि एपीआय सचिन वाझे यांच्या बदलीने झाला. त्यामुळे विरोधी पक्षाने महाविकास आघाडीला जोरदार फटका दिला आहे. याचे संपूर्ण यश हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे असून त्यांना कायद्याची जाण, प्रशासकीय पकड, आणि आक्रमकता या जोरावर हे शक्य झाले आहे. मात्र राज्यात कोरोनाचे बळी वाढत आहेत, कोरोना संक्रमणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने कहर केला आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

‘संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला जास्त जबाबदारीने वागावे लागते, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षाला अशा जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवट झाला, पण सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले? उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी आढळली. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यालगतच्या खाडीत सापडला यावरून विरोधी पक्षाने विधिमंडळात कामकाज होऊ दिले नाही. ही गाडी सचिन वाझे या अधिकाऱ्याच्या ताब्यात चारेक महिन्यांपासून होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!