Share

व्यापाऱ्याकडून तब्बल ४३ शेतकऱ्यांची फसवणूक

Published On: 

🕒 1 min read

लातूर : सध्या राज्यात फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कोण कोणाला कसले आमिष दाखवून फसवलं याचं काही सांगता येत नाही. अशीच एक घटना लातूर येथे घडली आहे. एका व्यापाऱ्याने एक, दोन नव्हे तर तब्बल ४३ शेतकऱ्यांना फसवत २ कोटींचा चुना लावला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

व्यापारी वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हा डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मूगाची थेट गावातून खरेदी करीत होता. बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देतो म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आपला माल विकण्यास सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे तो व्यापारी शेतकऱ्यांना पैसेही देत होता. यातून त्याने अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तानाजी निवृत्ती देवकर यांनी २०१८-१९ मध्ये त्यांच्या शेतातील पाच लाख ४० हजार रुपयांचे १३३ क्विंटल सोयाबीन डोंगरे याला दिले. त्यावर डोंगरे याने देवकर यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या नावे धनादेश दिले होते. परंतु, ते बँकेत वटले नाहीत. काही दिवसानंतर देवकर यांनी डोंगरे यांच्याकडे विकलेल्या सोयाबीनच्या पैशाची मागणी केली. परंतु, त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर देवकर यांनी अधिक माहिती घेतली. त्यांच्यासारख्या ४३ शेतकऱ्यांनाही डोंगरे याने पैसे दिले नसल्याचे समोर आले. या सर्व शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम दोन कोटी १७ लाख ९० हजार ७५५ रुपये असून या सर्वांची फसवणूक झाली आहे. याबाबत देवकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संशयित डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!