Share

२० वर्षानंतर येणार ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल!

Published On: 

मुंबई : २००१ साली आलेल्या ‘रहना है तेरे दिल मे’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. आर माधवन आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट खुप गाजला होता. आजही या चित्रपटाची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. या चित्रपटाचे निर्माते वासु भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येणार आहे.

जॅकी भगनानी याला या चित्रपटाच्या सिक्वेल मध्ये विस वर्षानंतरची कहाणी दाखवायची होती. मात्र या चित्रपटातील मुख्य कलाकार आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांना एकत्र आणणे शक्य होत नाहीये. त्यामुळे नाइलाजास्तव कथेत बदल करुन नवीन कलाकारासह चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय जॅकी भगनानीने घेतला आहे. यातील प्रमुख भुमिकेसाठी कृती सेनॉनच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

२००१ मध्ये झालेल्या ‘रहना है तेरे दिल मे’ या मुळ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपुर प्रेम मिळाले होते. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. यामुळे या चित्रपटाचे चाहते सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहे. मुख्य अभिनेत्याच्या भुमिकेत कोणाची वर्णा लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!