Share

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला द्या-आ.प्रकाश सोळंके

Published On: 

🕒 1 min read

माजलगाव : मराठवाडा हा दुष्काळी प्रदेश आहे. मागील काही वर्षांपासून मराठवाड्याच्या जनतेला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दिवसांदिवस या समस्येमध्ये भर पडत चालली आहे. पण या समस्येला राज्य सरकार ही तितकेसे गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आपण बघत आहोत. याच समस्येचा पाढा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्या वळवून त्याचे पाणी मराठवाड्याला द्यावे अशी मागणी केली.

आ. सोळंकी यांनी विधानसभेत बोलताना,”मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त आहे. याठिकाणी दरवर्षी टँकरने पाणी पुरवावे लागते. कायमचा दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांचा परिणाम या भागावर झाला आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्या वळवून त्याचे पाणी मराठवाड्याला द्यावे, वेळप्रसंगी सिंचन विभागाने नदीजोड प्रकल्पांद्वारे हा प्रश्न मार्गी लावावा.” अशी मागणी केली.

पुढे बोलतांनी त्यांनी राष्ट्रीय बांबू मिशन मध्ये झालेल्या गैरव्यवहार बदल चौकशीची मागणी केली. “राष्ट्रीय बांबू मिशनची स्थापन आपल्या देशात झाली. या माध्यमातून बांबू विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळातील हितेश रेड्डी या अधिकाऱ्याकडून अनेक गैरव्यवहार घडल्याचे समोर आले आहेत.” याची चौकशी करण्यात यावी.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!