Share

“आता धोनी रिव्हिव्ह सिस्टीम नव्हे तर..” ; सुनील गावस्करांनी दिले डीआरएसला नवीन नाव

Published On: 

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कर्णधारांना डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टम) घेण्याचा अधिकार देण्यात येतो. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अचूक डीआरएस घ्यायचा. त्याने डीआरएस घेतल्यावर फार कमी प्रसंगी ते चुकीचे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे चाहते डीआरएस त्याला धोनी रिव्ह्यू सिस्टम म्हणू लागले. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेनंतर डीआरएसला नवीन नाव दिले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान गावस्कर यांनी डीआरएसला नवीन नाव दिले आहे. सामन्यादरम्यान टिप्पणी करताना गावस्कर म्हणाले, “पूर्वी जेव्हा एमएस धोनी योग्य रिव्ह्यू घेत असे, तेव्हा त्याला धोनी रिव्ह्यू सिस्टम म्हटले जायचे. आता रोहित शर्मा त्याचा योग्य वापर करत आहे, त्यामुळे तुम्ही त्याला नक्कीच रोहित सिस्टम म्हणू शकता.”

पूर्णवेळ कर्णधार म्हणून प्रथमच वनडेत मैदानात उतरलेल्या रोहितने तीन यशस्वी रिव्ह्यू घेतले आणि ते अचूक ठरले. सुनील गावस्कर रोहितवर खूप प्रभावित झाले. त्यांनी रोहितच्या कर्णधारपदाचे कौतुक केले. रोहितने आधी डॅरेन ब्राव्हो, नंतर निकोलस पूरन आणि शेवटी शामराह ब्रुक्सविरुद्ध योग्य रिव्ह्यू घेतला. तिघांवरही तिसऱ्या पंचाचा निर्णय भारताच्या बाजूने होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!