Share

म्युकरमायकोसिसला वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूकीचे ; तज्ञांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एकीकडे देशात म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) रुग्णांची संख्या वाढत असतानाच व्हाइट फंगस म्हणजेच पांढऱ्या बुरशीसंदर्भातही काही दिवसांपूर्वी इशारा देण्यात आला आहे. त्यातच आता यल्लो फंगसचाही पहिला रुग्ण उत्तर प्रदेशमधील गाझीयाबादमध्ये आढळून आला आहे. यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र आता ‘ब्लॅक फंगस आजार स्पर्शाने पसरत नाही. तसेच या आजाराला वेगळ्या रंगांवरून नवीन ओळख देऊ नये,’ अशी सूचना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केली आहे. डॉ. गुलेरिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काळ्या बुरशीचा आजार म्हणजेच ब्लॅक फंगसविषयी सूचना केल्या. ब्लॅक फंगस आजार स्पर्शामुळे पसरत नाही. तसेच वेगळ्या रंगांवरून ओळख देण्यात काहीच अर्थ नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले आहे. याशिवाय डॉ. गुलेरिया यांनी या आजाराची लक्षणे आणि करावयाच्या उपाययोजना यांविषयी माहिती दिली.

ब्लॅक फंगस आजार होऊ नये, यासाठी स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे. घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच पाणी उकळूनच प्यावे. शक्य असल्यास उकळवलेले गरम पाणी पिण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. तसेच नाकात दुखणे किंवा घसा खवखवणे, पोटात दुखणे अशी काही लक्षणे ब्लॅक फंगस आजाराची समोर आल्याचे सांगत रंगांपेक्षा लक्षणांवर भर देऊन शक्य तितक्या उपचार करण्यावर भर द्यावा, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

दरम्यान, या रुग्णांना एम्फोटेरीसीन-बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. याचाच अर्थ या इंजेक्शनचा कमतरता जाणवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!